International Tourism


सध्याचे जीवन हे खूप व्यस्त आणि धावपळीचे असल्याने व्यक्तीला स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र असा वेळ काढणे शक्य होत नाही. व्यस्त जीवनशैली आणि रोजचे एकच शेड्युल असल्याने प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या समस्येने त्रस्त असलेला दिसतो. यामुळे प्रत्येक माणसाने त्याच्या जीवनातील हरवलेले क्षण, आनंद, मौज-मज्जा आणि उत्साह परत अनुभवण्यासाठी थोडा वेळ  का असेना भटकंतीसाठी राखून ठेवायलाच हवा. यासाठी ‘जागतिक पर्यटन दिन’ या दिवसासारखी उत्तम संधी नाही. दरवर्षी २७ सप्टेंबरला हा जागतिक पर्यटन दिवस सर्वत्र साजरा केला जातो.
प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात पर्यटन तसेच भटकंती आणि आपल्याच आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेट दिल्याने आनंदासोबत काही अविस्मरणीय क्षण निर्माण होतातच.  या बरोबरीने कोणत्याही देशासाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासातही पर्यटनाची अतिशय महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आजच्या युगात देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्याकडे प्रत्येक देशाचा स्वतंत्र कल असतो, आणि ही अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी पर्यटन हे क्षेत्र अति महत्वाचे मानले जाते. भारतासारखे अनेक देशामध्ये पर्यटन उद्योगामधून येणारी मिळकत देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान ठरते. पर्यटन दिवसाचे महत्व तसेच त्याची असणारी लोकप्रियता बघता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९८० ला ‘जागतिक पर्यटन दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता जागतिक पर्यटन दिवसासाठी ‘२७ सप्टेंबर’ हा दिवस निवडला गेला.

या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून, कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वन डे रिटर्न जाऊन येण्यासारखी आपल्या महाराष्ट्रातच जवळपास अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. फक्त महाराष्ट्राचा विचार करता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र- खानदेश आणि गोवा या वेगवेगळ्या विभागात पर्यटकांना खुणावणारी आणि लक्षवेधी ठरणारी असंख्य पर्यटन ठिकाणे आहेतच. परंतु, खास मुंबईला लाभलेले वैभव म्हणजे गेट वे ऑफ इंडिया, हाजी आली, कान्हेरी गुफा, सिद्धिविनायक मंदिर, एलिफंटा गुफा, जुहू बीच, चौपाटी बीच, कुलाबा मार्केट,  ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, मरीन ड्राईव्ह, एस्सल वर्ल्ड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कमला नेहरू पार्क, महालक्ष्मी मंदिर, माउंट मेरी चर्च, जहांगीर गॅलरी, वरळी सीफेस असे अनेक ठिकाणं विदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशातही पर्यटनाला विशेष महत्त्व आहे. भारताचे नाव फक्त पुरातन आणि आपल्या संस्कृतीच्या लोभसवाण्या दिसणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांपुर्ते मर्यादित नसून संपूर्ण विश्वात भारताचे नाव हे ताठ मानेने घेतले जाते. आपल्या सौंदर्याने आणि कलाकुसरीने मनमोहून टाकणाऱ्या असंख्य पर्यटन स्थळांचा ‘भारत’ हा देश आहे. भारतात असणारे  भव्य-दिव्य स्मारक असो, पुरातन प्राचीन देवाची मंदिरे असो, सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या वास्तू याचे अनोखे नाते आहे.

सप्टेंबर २००२ साली भारतीय पर्यटन विभागाने  ‘अतुल्य भारत’ या नावे एक अभियान सुरु केले.  भारतीय पर्यटनाला जागतिक स्तरावर महत्व प्राप्त करून देणे हे  या अभियानाचे मूळ उद्धिष्ट असून ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. देश-विदेशातील पर्यटकांना याचा लाभ घेता याव्या याकरिता, भारतातील बऱ्याच राज्यांनीही पर्यटकांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

केरळ, आग्रा, कशी- मथुरा, मध्यप्रदेश, राजस्थान अशी काही भारताची प्रमुख पर्यटन स्थळे आहे. परदेशी पर्यटकांसाठी भारतातील पर्यटन स्थळे नेहमीच आकर्षण ठरते. दरवर्षी भारतात सुमारे लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दाखल होत असतात. सौंदर्याने परिपूर्ण असणारे सांस्कृतिक पर्यटन स्थळे, समुद्र किनारपट्टी, धार्मिक-तीर्थ स्थळांची यात्रा हे परदेशातून आलेल्या पर्यटकांना उत्तम पर्याय ठरतात.

Pages

Designed By : Tech Webz Services | techwebz.in